Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना आज होणार

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना आज होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वारंवार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता._

सामना पुन्हा सुरु होणार, अशी शक्यता होती. त्याचवेळी वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली. अखेर पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या होत्या._

आज सोमवारी येथूनच पुढे सामन्याला सुरुवात होणार आहे. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर आहेत. गिल आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतके ठोकली._

तसेच नियमांनुसार, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल देण्यासाठी दोन्ही डावांमध्ये किमान 20-20 षटकं खेळवली जाणे गरजेचे असते. म्हणजेच, रिझर्व्ह डेच्या दिवशी जर पाऊस आलाच, तर सामन्याचा निकाल काढण्यासाठी पाकिस्तानला किमान 20 षटकं खेळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, आणि त्यानंतरच डकवर्थ लुईस नियमानुसार, निकाल काढला जातो. पाकिस्तान टीम 20 ओव्हर्सही खेळू शकली नाही, तर मात्र आजचा सामना थेट रद्द केला जाणार आहे._

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रिझर्व्ह डेच्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि सामना खेळवलाच गेला नाही, तर मात्र सामना रद्द करण्यात येणार आहे. अशातच या दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे