दररोज दारु पिऊन आई वडिलांना मारतो अखेर बापानेच केली मुलाची हत्या
महाराष्ट्रातील बातमीपत्र (मुंबई, प्रतिनिधी ):-घरातील सिडीवरुन पडून जखमी होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिस तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे या तरुणाची हत्या त्याच्या वयोवृद्ध बापानेच केली दररोज दारु पिऊन मुलगा आई वडिलांना मारहाण करत होता अखेर बापाने कंटाळून ३० वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली नंतर नायलनच्या रस्सीने गळा आवळून त्याची हत्या केली.
– डोंबिवली पश्चिमेतील सरवर नगर परिसरात अभिमन्यू पाटील हे राहतात अभिमन्यू पाटील यांच्या घरात त्यांची पत्नी त्यांची दोन मुले राहतात मोठा मुलगा हा गावी आहे लहान मुलगा हरेश याला दारुचे व्यसन होते दररोज तो दारुच्या नशेत घरी येत होता आई वडिलांशी भांडण करीत होता मंगळवारी रात्री हरीष घरी आला रात्री वडिलांसोबत त्याचे भांडण झाले. या भांडणा दरम्यान हरेश ची आई हे भांडण पाहून कुठे तरी निघून गेली नंतर आई घरात आली तर पाहिले हरेश घरात जखमी होऊन पडलेला आहे त्याचा मृत्यू झाला आहे नंतर विष्णूनगर पोलिसांना याची माहिती दिली गेली. पोलिसांनी या प्रकरणात हरेश चा मृतदेह पोस्टमार्टमकरीता पाठविला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे मयत हरेशचे वडिल अभिमन्यू यांनी सांगितेल की, घराला लागून असलेल्या शिडीवरुन पडून जखमी झाला होता त्यामुळे हरेश चा मृत्यू झाला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुराडे, विष्णूनगर वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दीपविजय भवर यांनी सुरु केला पोलिस तपासात धक्कादायक खुलासा झाला. हरेश याची हत्या त्याचे वडिल अभिमन्यू यांनीच केली होती हरेश दररोज पिऊन येऊन आई वडिलांना मारहाण करीत होता. शिवीगाळ करीत होता. अखेर मंगळवारच्या रात्री वाद विकोपाला गेला वडिलांची सहनशीलता संपली. वडिलांनी एका दांडक्याने दारुच्या नशेत असलेल्या हरेशच्या डोक्यावर प्रहार केला त्यात तो जखमी झाला व खाली पडला नंतर नायलनच्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. विष्णूनगर पोलिसांनी अभिमन्यू पाटील याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरु आहे.

