क्षुल्लक वादातून मेहुण्याने केली भावोजीची हत्या; पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

क्षुल्लक वादातून मेहुण्याने केली भावोजीची हत्या; पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

MB NEWS नागपूर:- घरासमोरून जोराने वाहन नेणाऱ्या व्यक्तीसोबत वाद घालून दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना बेलतरोडी येथील झोपडपट्टीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी साळ्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. दिलीप शाहु असे मृतकाचे नाव आहे. गणेश शाहु, पियूष लिल्लारे,आकाश लिल्लारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते तिघेही मजुरी करतात. गणेश शाहू हा मृत दिलीप शाहु याचा साला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पेंटिंगचे काम करीत असून त्याच्यावर २०१६ साली हत्येचा गुन्हा दाखल आहे. या शिवाय तो जुगार, दारू विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी रात्रीच्या सुमारास दिलीप आपल्या मित्र पियूष बंडुजी सोनटक्के यांच्यासह मोटारसायकलवरुन जात होता. यावेळी तिथे मृत दिलीप शाहू याचा साला गणेश शाहू आपल्या मित्रासह बसला होता.

यावेळी त्याने जावयाला थांबवून इतक्या जोरात मोटारसायकल का चालवीत आहेस असे विचारले. त्यामुळे त्याने गणेश याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान त्यामुळे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यानंतर गणेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यासह मित्रावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी करीत पसार झाले. दरम्यान परिसरातील नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल येथे नेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याशिवाय पियूष सोनटक्के याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी गणेश आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास  मुकुंद कवाडे, पोलीस निरीक्षक,बेलतरोडी पोलीस स्टेशन करीत आहे..

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे