Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बालिकेचे अपहरण करुन खून करणारा आरोपी पोलीसांचे ताब्यात

बालिकेचे अपहरण करुन खून करणारा आरोपी पोलीसांचे ताब्यात

MB NEWS (नंदुरबार) प्रतिनिधी :-10 सप्टेंबर रोजी तळोदा येथील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकाचे अपहरण होऊन खून झाल्याची घटना घडली. घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीला अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे. सदर पीडित मुलगी तिचे भावासोबत शाळेत जाते असे सांगून घरातुन निघुन गेली. दुपारी शाळा सुटल्यावर मुलगा हा एकटाच घरी आला पालकांनी बहिणीबद्दल विचारपूस केली असता  मुलाने सांगितले की, ती एक लाल रंगाच्या मोटार सायकलवर बसून कुठे तरी निघुन गेली आहे. त्यावरुन पालकांनी तिचे शाळेत व आजु-बाजुच्या परीसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून आली नाही. त्यावरुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुध्द् अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेले असल्याची माहिती तळोदा पोलीसांना मिळाली. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजु लोखंडे व पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहाचले. त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली व वरीष्ठांना घटनेबाबत माहिती दिली. सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोनि श्री. हेमंत पाटील व इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा, नंदुरबार शहर, अक्कलकुवा व शहादा पोलीस ठाणे सह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना तात्काळ तपासकामी रवाना केले.13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत सविस्तर माहिती दिली.सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक. आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी. दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक , किरणकुमार खेडकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  गुलाबराव पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक. राजु लोखंडे, याच्या पथकाने केली आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे