Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

इंदोरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसणे भर रस्त्यात अचानक घेतला पेट

इंदोरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसणे भर रस्त्यात अचानक घेतला पेट

MB NEWS (धुळे) – मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी एक खाजगी प्रवासी बस अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना देवभाने परिसरात घडली. मुंबईहून इंदोरच्या दिशेने निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. टायर पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, बस पेटण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे