आर आर विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

आर आर विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

MB NEWS (जळगाव प्रतिनिधी) जळगावातील आर आर विद्यालयात खेळताना नववीचा विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली होती
कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणात मारहाणीदरम्यान मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे
-या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
-शाळेत खेळत असताना कल्पेशाचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाला झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
-या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 22 तासानंतर आज मयत विद्यार्थ्याचं शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
-शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे
-शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे