नागपूरच्या पूर्व RTO कार्यालयात दलालशाहीचा कळस; मनसेचा गंभीर आरोप.

नागपूरच्या पूर्व RTO कार्यालयात दलालशाहीचा कळस; मनसेचा गंभीर आरोप.

MB NEWS (नागपूर) – उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूरात पैसे घेतल्या शिवाय काम होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. दलाला मार्फ़त गेले तरच काम होते असाही आरोप करण्यात आला आहे
या कार्यालयात पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप करण्यात यावेळी परिवहन कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची मागणी करण्यात आली
अनेक तक्रारी मनसेकडे आल्यात त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना दिले आहे. मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केले जाते असा आरोप मनसेकडून करण्यात आला.पुढील सात दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल..
यात फॉर्म भारतानं स्वतः गेल्यास काम करण्यासाठी पैसे द्यावे लागते, अनेक काम होत नाही, मात्र दलाला मार्फत गेले तर काम होतात. यात रेषा मारल्या जातात, या रेषेवरून पैसे देण्याचं ठरत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुगकर यानी केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे