Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, अशी असणार भरती प्रक्रिया

राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, अशी असणार भरती प्रक्रिया

राज्यातील हजारो भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागाने *३१ मे २०२६* पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत

भरतीची खास वैशिष्ट्येराज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, अशी असणार भरती प्रक्रिया
मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त जागांचाही यात समावेश केला जाणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदे उपलब्ध होतील
* जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न आता सुटणार आहे
* संपूर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याने वशिलेबाजीला पूर्णपणे चाप बसेल

प्रक्रियेचे वेळापत्रक आणि नियम
* *१ ते ३१ मे-* शाळांना रिक्त पदांची नोंदणी करण्यासाठी मुदत.
* *जून महिना-* उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शाळांचे पसंतीक्रम (Preferences) नोंदवता येतील.
* *निवड पद्धत-* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा केवळ गुणांच्या आधारे भरल्या जातील, तर खासगी संस्थांना एका जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावता येईल.

यांना मिळणार संधी
ज्या १ लाख ७० हजार उमेदवारांनी ‘TAIT’ परीक्षा देऊन आपली ‘स्व-प्रमाणपत्रे’ (Self-Certification) पूर्ण केली आहेत, त्यांना या प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे