सराफा लाईन मध्ये असलेल्या प्रतिष्टीत व्यापारी तिवसा मधील घटना,दागिने आणि पैसे लुटून हत्या

सराफा लाईन मध्ये असलेल्या प्रतिष्टीत व्यापारी तिवसा मधील घटना,दागिने आणि पैसे लुटून हत्या

MB NEWS :-(सुनिल घोरमाडे)तिवसा:- शहरामध्ये राहणाऱ्या प्रतिष्टीत व्यक्तीच्या घरात घुसून भर दिवसा हत्या करण्यात आली.सदर सराफा लाईन मध्ये व्यावसायिक होते.त्यांचे दुकान बाजारवडीत मांडळे ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध आहे.त्यांचे नाव श्री.संजयराव भगवंत मांडळे आहे.वय 55 वर्ष असून .मृत व्यक्ती तिवसा मध्ये राहत होते.ही घटना सोमवारी दिनांक 27 ला सायंकाळी 6 वाजता घडली.सोमवारी त्यांची पत्नी, मुलगा हे दोघे रुग्णालयात काम असल्यामुळे अमरावतीत आले होते. काही दिवसा पूर्वी मृत व्यक्तीचा अपघात झाला होता.त्यामुळे ते घरीच होते. सायंकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास मांडले यांच्या पत्नी व मुलगा अमरावती वरून घरी पोहचल्यावर सदर घटना बघताच त्याच्या परिवाराला धक्का बसला. कारण त्यांचा दरवाजा उघडा होता. संजय मांडले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.हा प्रकार तात्काळ नागरिकांना व तिवसा पोलिसांना माहित झाला. पोलिसांनी तात्काळ घटना स्थळीच पोहचले. दरम्यान मांडले यांची दागिने ठेवलेली बॅग त्यांच्या कुटुंबानी पाहली असता ती कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे मारेकर्यांनीच ती लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करून सोने लुटण्यासाठीच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज तिवसा पोलिसांनी वर्तवला आहे.

बॅग मध्ये किती सोने होते, मारेकर्यांनी लूट करण्यासाठी खून केला कि अन्य काही कारण होते याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.ही सर्व माहिती पोलीस स्टेशन तिवसा येथून प्राप्त झाली असून, पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे