*श्री शिवचंदजी लढा विद्यालय,शिवणगाव येथे नागपंचमी निमित्त सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा याबद्दल मार्गदर्शन*
MB NEWS 365: सुनिल घोरमाडे : तिवसा प्रतिनिधी :-दि.29 जुलै 2025 रोजी श्री शिवचंदजी लढढा विद्यालय, शिवणगांव येथील “राष्ट्रीय हरित सेना” व स्व. लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय, तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीनिमित्त समाजामध्ये सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री संजयजी सोनपरोते हे होते तर सापाबद्दल मार्गदर्शन करण्याकरीता ‘हरित सेना”प्रभारी श्री दिलीप गायगोले हे उपस्थित होते मार्गदर्शन करताना सापाबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे.त्यामुळे साप दिसताक्षणी त्याला आपण तो विषारी आहे की, बिनविषारी आहे याचा विचार न करता त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपले व शेतकऱ्याचे मोठे नुकसान करतो कारण साप हा आपला शत्रू नसून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे साप हा शेतामध्ये असलेले उंदीर, कीटक, पाली, सरडे, बेडूक व इतर किडे खाऊन शेतकऱ्याच्या पिकाचे हानीपासून संरक्षण करतो. महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकूण सापांच्या 52 जाती व त्यापैकी 5 जाती विषारी 2 जाती निमविषारी व उर्वरित ह्या बिनविषारी याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली तसेच समाजामध्ये असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा 1)साप दूध पितो 2)साप बिन वर डोलतो 3)साप धनाचे रक्षण करतो 4)साप हा माणसाचे रूप धारण करतो 5)साप ड्यूक धरतो 6)सापाच्या डोक्यावर नागमणी असतो 7)सापाला केस येतात ह्या सर्व गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला साप चावल्यानंतर सर्वप्रथम काय उपाययोजना कराव्यात 1)साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपावे 2)ज्या ठिकाणी साप चावला त्याच्या वरच्या बाजूला घट्ट बांधून घ्यावे3) कुठल्याही धारदार वस्तूने साप चावला त्या ठिकाणी काप देऊ नये 4)ज्या ठिकाणी सापाने चावा केला ती जागा निर्जंतुकीकरण करावी 5)त्या व्यक्तीला खायला किंवा पिण्याकरीता काहीच देऊ नये 6)आणि त्या पेशंटला मानसिक धीर द्यावा 7)व कुठल्याही मांत्रिका कडे किंवा देवाजवळ न जाता तात्काळ दवाखान्यांमध्ये नेऊन डॉक्टरांच्या सल्लेप्रमाणे औषधोप्रचार करावा.यासारखी अनमोल माहिती “हरित सेना” प्रभारी श्री दिलीप गायगोले यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी कु. नेहा पोटे, प्रास्ताविक कु. प्रतीक्षा गुल्हाने व आभार प्रदर्शन कु. कृतिका मालपे हिने केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करता प्रिया डहाके, लक्ष्मी तायडे,पायल बुरघाटे यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर वृद उपस्थित होते.
🟥🟦🟩🟨🟥🟦🟩🟨
👆लिंक टच करा👆
🟥🟦🟩🟨🟥🟦🟩🟨
अधिक बातम्या करीता
https://mbnews365digital.in वर भेट द्या
मो. 9767399009




