मोठी बातमी -नगरपरिषद निवडणूक.उद्याची मतमोजणी रद्द….
MB NEWS (नागपूर) -राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. तसेच याची मतमोजणी उद्या (3 डिसेंबर) होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत मोठा निर्णय दिला. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला करा, असे निर्देश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाने काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुकीवर परिणाम होऊ नये, त्यामुळे सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच घ्या, असे कोर्टाने सांगितले.

