पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी मध्ये किर्लोस्कर कंपनीच्या ओपन कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन*
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) :-अमरावती -पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी किर्लोस्कर कंपनीतर्फे १५ व १६ ऑक्टोबर रोजी ओपन कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या ओपन कॅम्पस ड्राइव्हमुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक ज्ञानाचे व कौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने व प्राचार्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, संबंधित विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेसमेंट विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

