स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी भव्य सामूहिक विवाह सोहळा
स्व. सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम; नोंदणीची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२७
MB NEWS(अमरावती))):-दुष्काळग्रस्त व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या मुला-मुलींचे विवाह सन्मानपूर्वक संपन्न व्हावेत, या सामाजिक उद्देशाने स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२७ रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप, अमरावती येथे संपन्न होणार असून, या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक पात्र वधू-वरांनी २५ जानेवारी २०२७ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक सामाजिक कार्याचा वारसा
स्व. सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत २००५ मध्ये २,१०० जोडप्यांचा, तर २००६ मध्ये तब्बल ३,१०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या ऐतिहासिक उपक्रमामुळे सामूहिक विवाह चळवळीला मोठी चालना मिळाली. त्यावेळी ट्रस्टच्या वतीने प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्यात आले होते. पुढे या उपक्रमाचे अनुकरण अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी नवविवाहित वधू-वरांना आशीर्वाद देत ट्रस्टच्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच, सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांसाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचा सहाय्यता निधी जाहीर केला होता. या निर्णयामुळे सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून नवदांपत्यांना आर्थिक मदत देण्याच्या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले. अशा प्रकारे, सामाजिक बांधिलकीतून सुरू झालेल्या या उपक्रमाने महाराष्ट्रात सामूहिक विवाह सोहळ्यांना नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन ट्रस्टने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अडचणींमुळे मुला-मुलींचे विवाह करण्यास अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांना दिलासा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
वधू-वरांसाठी विविध सुविधा
या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याचा विवाह धार्मिक विधी व पारंपरिक पद्धतीनुसार संपन्न होणार आहे. प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र पंडितांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वधू-वरांना कपडे, मंगळसूत्र, ओढणी, दुपट्टा, जॅकेट, चप्पल व बूट आदी साहित्य देण्यात येणार आहे.
विवाह सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक जोडप्यासोबत वधूपक्षातील पाच आणि वरपक्षातील पाच, अशा एकूण दहा व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांना विवाह सोहळ्यात सहभागी होता येणार असून, विवाह सन्मानपूर्वक पार पाडण्यास मदत होणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र वधू-वरांनी नोंदणी करताना खालील कागदपत्रे सादर करावीत :
१. वधू व वर यांचे आधारकार्ड
२. आवश्यक प्रतिज्ञापत्र
३. ग्रामपंचायतीचा दाखला
४. पोलीस पाटील यांचा दाखला
५. सातबारा उतारा (७/१२)
इच्छुक पात्र वधू-वरांनी आवश्यक कागदपत्रांसह आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून अधिकृत नोंदणी करावी. नोंदणीची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२७ असून, इच्छुकांनी विहित मुदतीत नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण उपक्रम
आजच्या काळात विवाह सोहळ्याचा वाढता खर्च सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दुष्काळामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही मुला-मुलींचे विवाह पार पाडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ट्रस्टने सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अशा कुटुंबांना आधार देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमामुळे विवाहावरील आर्थिक भार कमी होण्यास, अनावश्यक खर्चाला आळा बसण्यास आणि वधू-वरांना वैवाहिक जीवनाची सन्मानपूर्वक सुरुवात करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
सामूहिक विवाह सोहळा हा केवळ विवाहाचा कार्यक्रम नसून, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा आणि समाजात एकता, बंधुता व सहकार्याची भावना दृढ करणारा सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमात पात्र वधू-वरांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन स्व. सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व विवाह समितीचे श्री बबनराव आवारे,
श्री. संतोषराव काळपांडे,श्री. विवेक हाडोळे,श्री. भारतराव खांडे,श्री. दत्ताभाऊ कुचे,श्री. नितीन कडू ,श्री. संजयराव काळे,श्री. सुदाम पंडागरे,श्री . पंजाबराव पवार ,श्री. लक्ष्मीकांत तायडे ,श्री. विजय गवळीकर,श्री. सतिशराव राउत ,श्री. अनिल मलमकर ,श्री. ज्ञानेश वणवे ,श्री. घनश्याम पेठे, श्री. रविंद्र अंबलकार ,श्री. शशिकांत कोकाटे,
श्री. विजय उभाड,श्री. ज्ञानदीप येवले ,श्री. आशिष धाडे,श्री. दिलीपराव निंभोरकर,श्री. बबनराव लायदे ,राम खंडारे,
दिलीपभाऊ निंभोरकर,प्रकाश पुंड ,
डी. निकम ,अक्षय पोटे, श्रेयस पोटे पाटील, श्रुतीताई पोटे पाटील,संदीप जाधव, आकाश कदम, रामदेव जोशी, अमोल काळे, सुरेश पठारे, रोहित देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच
नोंदणी करिता संपर्क
7499022313,
7499036153

